जयसिंगपूरमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई; एकाला अटक

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

 अंमली पदार्थ विरोधी कारवाई अंतर्गत जयसिंगपूर पोलिसांनी गांजा सेवन करताना एका तरुणाला रंगेहात पकडले. शुभम भरत भोसले (वय २३, रा. नोकर हौसिंग सोसायटी, जयसिंगपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:३५ च्या सुमारास जयसिंगपूर पोलिसांना आंबेडकर हौसिंग सोसायटीजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण गांजाचे सेवन करत असल्याची माहिती मिळाली. यानुसार, पोलीस निरीक्षक किशोर अंबुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली आणि शुभम भोसले याला ताब्यात घेतले.

झडती घेतल्यावर, १ ग्रॅम गांजा, चिलपी कंपनीची काडेपेटी (१२ काड्यांसह) आणि दोन अर्धवट जळालेल्या काड्या आढळून आल्या. सदर मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

याप्रकरणी फिर्यादी वैभव लक्ष्मण सुर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार, आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पो.स.ई. किशोर अंबुडेकर, पो. हे. कॉ. संतोष जाधव, पो. ना. ताहीर मुल्ला आणि पो. कॉ. बाळासो गुत्ते कोळी यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर अंबुडेकर करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष