हेरवाड येथे शिवजयंतीनिमित्त प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता शिवप्रतिमा पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता शिवप्रतिमा पालखी मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात वातावरण शिवमय होईल. यानंतर ११ वाजता प्रा. श्री. अरुण घोडके यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर प्रकाश टाकण्यात येईल. दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतील. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा समाज हेरवाडच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने केले आहे. संपूर्ण गावात शिवजयंतीच्या तयारीला जोरदार उत्साह दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष