माई विद्या मंदिरच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
माई विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका यांच्या संकल्पनेतून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट दिली.
या वेळी पोलीस अंमलदार मा. वसंत घुगे सर व महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषेत संचलन करत पोलिसांना मानवंदना दिली. तसेच, त्यांनी अनेक प्रश्न विचारून पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. सत्कार समारंभ या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस अंमलदार वसंत घुगे सर आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माई विद्या मंदिरच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा