राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद : सप्नील जोशी

 जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद आहे. हा पुरस्कार मला भावी कार्यात प्रोत्साहन देणारा ठरेल. जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांना बळ देण्याची भूमिका घेतली आहे. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन, अभिनेता स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले. 

जयसिंगपूर नगरपरिषद व आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वप्निल जोशी बोलत होते.

बहारदार नृत्य, मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा ठेका, रसिक प्रेक्षकांचा सळसळता उत्साह आणि मराठी चित्रपट, मालिकांमधील आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीने जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवाने रविवारी उपस्थित हजारोंची मने जिंकली. आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी, रिंकू राजगुरू यांच्यासह झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील ऋषिकेश शेलार म्हणजे अधिपती आणि शिवानी रांगोळे म्हणजेच अक्षरा, मराठी बिग बॉस फेम धनंजय पवार, 'सुर नवा ध्यास नवा' या रियालिटी शोची विजेती गायिका राधा खुडे यांचा राजर्षी शाहू पुरस्काराने करण्यात आलेला गौरव रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. 

   

    शहरातील विक्रमसिंह मैदानावर रविवारी (ता.९) रात्री झालेल्या राजर्षी शाहू महोत्सवात आघाडीच्या कलाकारांना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, उद्योगपती विनोद घोडावत यांच्या हस्ते 'राजर्षी शाहू पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. तत्पूर्वी इंडियन म्युझिक अकॅडमी, ओंकार डान्स अकॅडमी, विठाई महिला बचत गट, दानलिंग विद्यालय, जनतारा विद्यालय, गायक राधा खुडे यांची खेळून ठेवणारी गाणी, प्रणव रावराणे, अमृता सपकाळ यांचे विनोदी स्किट, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. 

    यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याधिकारी टीना गवळी यांनी हा महोत्सव व्यसनमुक्तीला समर्पित करण्यात आला असून पालिकेच्यावतीने महोत्सवाला सहकार्याची ग्वाही दिली. समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी स्वागत करताना दीर्घकाळानंतर सुरू झालेला हा महोत्सव अखंडितपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. 


    महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी प्रास्ताविकात महोत्सवाचा आढावा घेत जिल्हा नियोजनमधून २५ लाखाची तरतूद करण्याची मागणी केली. आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दरवर्षी २६ जानेवारीला खंडित झालेली शूटिंगबॉल स्पर्धा सुरू करण्याची ग्वाही दिली. कला सादरीकरण केलेल्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

उद्योगपती विनोद घोडावत, मुख्याधिकारी टीना गवळी, महोत्सव समितीचे उपाध्यक्ष राहुल बंडगर, अस्लम फरास, महेश कलकुटगी, रमेश यळगुडकर, मेघराज घोडके, शुभम झेले, राजू आडके, दादासो पाटील-चिंचवाडकर, शितल गतारे, अर्जुन देशमुख, संभाजी मोरे, माजी नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, शिवाजी कुंभार, बाळासो वगरे, रजनीकांत कांबळे, सुनिल मजलेकर, युवराज शहा, गणेश गायकवाड, सुभाष मुरगुंडे, प्रविण बलदवा, बजरंग खामकर, राजेश मालू, विक्रम खाडे, रोहित नांद्रेकर, संतोष खामकर, जुनेद गवंडी, अशोक मळगे यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष