राजमुद्रा क्रीडा मंडळ, हेरवाडच्या निरंजन पुजारीची कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघात निवड
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मनमाड (नाशिक) येथे होणाऱ्या ३५ व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी MPSC संचलित राजमुद्रा क्रीडा मंडळ, हेरवाड चा खेळाडू कु. निरंजन सचिन पुजारी याची कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
राजमुद्रा क्रीडा मंडळाने अनेक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, निरंजन पुजारी याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर जिल्हा संघात स्थान मिळवले आहे. त्याच्या या निवडीमुळे हेरवाड गाव आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.
मनमाड येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील उत्कृष्ट संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत निरंजन आपल्या खेळातून संघासाठी बहुमूल्य योगदान देईल, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
निरंजन पुजारीच्या निवडीबद्दल त्याचे प्रशिक्षक, क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, गावकरी आणि कुटुंबीयांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या यशामागे त्याच्या कुटुंबीयांचे आणि प्रशिक्षकांचे मोठे योगदान आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा