शिवजयंतीनिमित्त श्री गुरुदत्त शुगर्स लि. टाकळीवाडी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
शिवजयंतीच्या निमित्ताने श्री. गुरुदत्त शुगर्स लि., टाकळीवाडी येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, १९ फेब्रुवारी आणि गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडणार आहे.
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू म्हणून ट्रॅव्हल्स बॅग दिली जाणार आहे. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाचे फॉर्च्यून कॉम्प्लेक्स इचलकरंजी येथील तिकिट मोफत दिले जाणार आहे.
रक्तदान हे जीवनदान असते, या भावनेतून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवला जात असून, रक्तदानाद्वारे गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला जाणार आहे.
"चला, माणुसकीवर प्रेम करू, रक्तदानातून जीवनदान देऊया!" या घोषवाक्यासह आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा