दलित पँथरतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी



संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथे दलित पँथरच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे राज्य सरचिटणीस प्रा. अशोक कांबळे होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाली, जे दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष मुबारक शेख यांनी केले. यावेळी मोहन नाईक, बरकत आलासे आणि सुरेश मंडलिक यांनी आपली विचारमांडणी केली.

कार्यक्रमास सौ. अपेक्षा कांबळे, सौ. पदमा जाधव, सौ. संगीता गोसावी, सौ. ज्योती भास्कर, चंद्रकांत कांबळे, सतीश राजमाने, सुधीर कमलाकर, दीपक जाधव, इम्रान मुल्ला, मनोज भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी आतिष बनसोडे यांनी आभार मानले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष