शिवार न्यूजचे प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे ‘शिव प्रेरणा आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित



कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

  दसरा चौक, शाहू स्मारक भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय जयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त शिवार न्यूजचे पत्रकार प्रल्हाद साळुंखे यांना ‘शिव प्रेरणा आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साळुंखे यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान हातकणंगले तालुक्याचे आमदार अशोकराव माने, स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन रमेश माने, परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुरणे आणि स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मचिंद्र रूईकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष