टोपमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला लवकरच होणार सुरुवात : आमदार यड्रावकर यांची माहिती



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

हातकणंगले तालुक्याती टोप गावातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राची (PHC) प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे १ एकर जागेत प्रशस्त आरोग्य केंद्राची इमारत उभे राहणार आहे. त्यामुळे गावातील आरोग्य यंत्रणा सक्षम बनणार आहे.

आमदार यड्रावकर यांनी आरोग्य राज्यमंत्री पदावर असताना टोप येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले होते. मात्र, जागेचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे इमारतीच्या कामाला सुरुवात झाली नव्हती, अखेर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी टोपसाठी १ एकर जागा आरोग्य विभागाला उपलब्ध करून दिल्याने मंजूर झालेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

कोरोना काळात स्थानिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची गरज लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी गावासाठी आरोग्य उपकेंद्राची मंजुरी मिळवली होती. मात्र, जागा नसल्याने आरोग्य उपकेंद्रासाठी मंजूर झालेल्या इमारत झालेली नव्हती. अखेर, आमदार यड्रावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन टोप गावातील आरोग्य उपकेंद्राला १ एकर जागा उपलब्ध करून दिल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाला सुरुवात होणार आहे.

या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे टोप गावातील रहिवाशांना या आरोग्य केंद्राचा मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत त्यांना प्राथमिक उपचारांसाठी तालुक्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. नव्या आरोग्य केंद्रामुळे गर्भवती माता, वृद्ध, लहान मुले आणि आपत्कालीन रुग्णांना त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.

यासोबतच, गावात दरमहा आरोग्य तपासणी शिबिरे, लसीकरण मोहीम आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांवर मार्गदर्शन मिळू शकेल. शासनाच्या विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांचाही लाभ नागरिकांना सहज मिळणार आहे. जागा मंजूर झाल्यामुळे टोप गावात आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष