१८ ते २२ फेब्रुवारी अखेर नाट्य शुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम : स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
नाट्य शुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जयसिंगपूर नगरपालिकेच्या सहकार्याने नाट्य शुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ते शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी अखेर स्व. ललित बागरेचा रंगमंच, सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम, मोफत आरोग्य शिबिर, एकांकिका महोत्सव, नाट्य शुभांगीच्या रंगकर्मी तसेच प्रेरणा पुरस्काराचे वितरण यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताअध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नाट्य शुभांगीचे अध्यक्ष सुभाष पाटील टाकळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार दि. १८ रोजी सायंकाळी ६ वाजता खासदार धैर्यशील माने त्यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उद्योगपती ओमप्रकाश मालू, उद्योगपती विनोद घोडावत, प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी, संजय हळदीकर हे उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता नाट्य शुभांगी प्रस्तुत महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. १९ रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य शिबीर व सायंकाळी ७ वाजता नाट्य शुभांगी परिवार प्रस्तुत कराओके गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि. २० रोजी सकाळी दहा वाजता डॉ. प्रीती शिंदे - पाटील यांचा लोकप्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी १० वाजता समूह नृत्य सादर करण्यात येणार असून यामध्ये शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ६ वाजता 'चलं थोडं ॲडजस्ट करू' हे २ अंकी नाटक होणार आहे. शनिवार दि. २२ रोजी नाट्य शुभांगी सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त स्व. बी. एन. चौगुले रंगकर्मी पुरस्कार वितरण व स्मरणीका प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी डॉ.दयानंद नाईक यांना स्व. बी एन चौगुले रंगकर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच नाट्य शुभांगी प्रेरणा पुरस्कार संस्था म्हणून मनोरंजन मंडळ इचलकरंजी यांना गौरवण्यात येणार आहे. त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा होणार असल्याची त्यांनी त्यावेळी बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेस नाट्य शुभांगीचे उपाध्यक्ष शिरीष यादव, सचिव रमेश यळगुडकर,राजेंद्र झेले,रविंद्र ताडे, कुमार हातळगे, भरत खिचडे, विलास जाधव, दशरथ शेट्ये, शुभम झेले,भरत पाटील, ओंकार कुलकर्णी, दीपक अणेगिरीकर, नगरपालिकेचे अभियंता जीवन सरडे यांच्यासह नाट्य शुभांगी परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा