सौ. तेजा पाटील यांना भौतिकशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
निगवे खालसा येथील सौ. तेजा अरविंद पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. स्टडीज् ऑन दी केमिकल रुट सिन्थेसिस ऑफ कॉपर कोबाल्ट ऑक्साइड/कंडक्टटींग पॉलीमर कॉम्पोसिट फॉर सुपरकॅपॅसिटर अँप्लिकेशन हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. या संशोधनात त्यांनी सुपरकॅपॅसिटर तंत्रज्ञानातील विविध पैलूंचा सखोल अभ्यास करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
सौ. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये ११ संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांना भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथील डॉ. व्ही. पी. मालेकर यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रा. कोठावळे सर, विभागप्रमुख, प्राचार्य चौगले सर व इतर प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
शिवाजी विद्यापीठ भौतिकशास्त्र विभाग, विभागप्रमुख व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. तेजा यांच्या संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेची संशोधन फेलोशिप प्राप्त झाली होती.
संशोधनाच्या या प्रवासात त्यांना त्यांचे पती डॉ. अरविंद पाटील तसेच संपूर्ण कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली. हे यश मिळवताना कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले, असे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिवार, मित्रपरिवार, महाविद्यालय व संशोधन संस्थेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा