हेरवाड येथे सिद्धीविनायक गणेश मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 हेरवाड येथील सिद्धीविनायक गणेश मंदिरात नवीन गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडणार आहे. या निमित्ताने ८ फेब्रुवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता नवीन गणेश मूर्तीचे हेरवाड नगरीत भव्य आगमन व नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता विधीवत पूजा व होमहवनाचा कार्यक्रम संपन्न होईल.

सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता विधीवत पूजा, होमहवन व नवीन गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. यानंतर, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यात सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिद्धीविनायक गणेश मंदिर ट्रस्ट व समता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, हेरवाड यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष