बसवराज गुंडकल्ले यांचा नगराध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार

 


बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क : 

सदलगा (ता. चिकोडी) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले बसवराज अण्णासाहेब गुंडकल्ले यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना बसवराज गुंडकल्ले म्हणाले, "मी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची ही खरी पोचपावती आहे. यापुढेही सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहील."

या कार्यक्रमाला दत्तवाडचे युवा नेते दादामोहन आदिशा चौगुले, युवा अध्यक्ष अनिल शिवगोंडा पाटील, मलिकवाडचे विजय देसाई, संजू इंगळे, दिलीप साळुंखे यांसह गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष