थकित पाणीपट्टी प्रकरणी आता पाटबंधारे विभाग ॲक्शन मोडवर..!
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
पाटबंधारे प्रकल्पाद्वारे सिंचन व बिगर सिंचन वापरा करीता पाणी पुरविण्यात येते. या पाणी वापराकरीता शुल्क आकारण्यात येते. सिंचन व बिगर सिंचन या वापराकरीता वेगवेगळी पाणीपट्टी आकारणी करण्यात येते. कागल पाटबंधारे विभागाकडील खाजगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व परवाना संमतीधारक यांनी २० मार्च पर्यंत पाणीपट्टी नाही भरली तर मोटर सील करणे तसेच विद्युत परवाने रद्द करण्याची कारवाईला संबंधितांना तोंड द्यावे लागणार आहे.
कागल पाटबंधारे विभागाकडे दूधगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, दानवाड, टाकळीवाडी या गावाचे कार्यक्षेत्र आहे. पाटबंधारे प्रकल्पाद्वारे सिंचन व बिगर सिंचन वापरा करीता पाणी पुरविण्यात येते. यामध्ये खाजगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व संमतीधारक यांचा समावेश आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार यंदाही जुन्या दरानेच म्हणजे हेक्टरी ११२२ रुपये प्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येत आहे.पाटबंधारे विभागामार्फत दूधगंगा धरणातून सदर गावातील सिंचणासाठी आवशकतेनुसार दत्तवाड व दानवाड-एकसंबा हे दोन बंधारे वारंवार भरून दिले जातात. तथापि त्या प्रमाणात वसुली खूपच कमी आहे. म्हणून
कार्यक्षेत्रातील वसुलीसाठी कागल पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संबंधित वापरकर्त्यांच्या पर्यंत पोहोचून पाणीपट्टी भरण्याबाबत प्रत्यक्ष भेटून आवाहन केले आहे. बहुतेकांनी ही पाणीपट्टी भरली आहे. पण काहींनी ही पाणीपट्टी अद्याप भरलेली नाही. पाणीपट्टी न भरल्यांच्याबाबत आता पाटबंधारे विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २० मार्च तारखेपर्यंत संबंधितांनी पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे मोटर सील करणे तसेच विद्युत परवाने रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे खाजगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व संमतीधारक यांनी पाणीपट्टी भरावी असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपट्टी न भरल्यास संबंधिताना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
थकीत पाणीपट्टी भरण्याबाबत सर्व बागायतदारांना वेळोवेळी सूचित केले आहे. तसेच प्रत्यक्ष गाव भेट उपक्रमाद्वारे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टी भरण्याबाबत सर्व बागायतदारांच्या घरी भेटून संबंधितांना विनंती केली आहे. या विनंतीला अनेकांनी प्रतिसाद देत पाणीपट्टी भरली आहे. अजूनही काही लोकांची पाणीपट्टी थकीत आहे. अशा लोकांनी आपली तसेच आपल्या संस्थेची पाणीपट्टी भरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे.
- राजेंद्र आरगे, शाखा अभियंता पाटबंधारे शाखा कागल

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा