राजू दडिकर (राजा हुली) यांचे अल्पशा आजाराने निधन
दानवाड :
कल्लोळ गावचे रहिवासी आणि दानवाड परिसरात परिचित असलेले राजू दडिकर उर्फ राजा हुली यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रामाणिक व कष्टाळू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने दानवाड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा