नूतन अध्यक्ष शशिकांत पाटील व सचिव गजानन कोले यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :
प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे नूतन अध्यक्ष श्री. शशिकांत पाटील व सचिव श्री. गजानन कोले यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी नवीन संचमान्यता या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. खासदार धैर्यशील माने यांनी राज्य सरकारकडे फेरविचार करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन संघटनेला दिले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय नेते श्री. एन. वाय. पाटील, शिक्षक समिती नेते अर्जुन पाटील (विभागीय राज्य उपाध्यक्ष व माजी चेअरमन, शिक्षक बँक), जयवंत पाटील (अखिल भारतीय शिक्षक संघ), सभाजी सिद (माजी तज्ज्ञ संचालक, शिक्षक बँक), इंद्रजित कदम (संपर्क प्रमुख, शिक्षक संघ), सोनाली परीट (महिला अध्यक्ष), घनश्याम तराळ, रेहाना मकानदार (संचालक, शिव शाहू पतसंस्था), प्रताप शिंदे (मुख्याध्यापक, केंद्र रुकडी), विजय कांबळे (मुख्याध्यापक, मुडशिंगी), राजकुमार भोसले, झहीर जमादार, राजेंद्र पाटील, मधुकर कांबळे, राजेंद्र म्हैशाळे, अनुजा भांड, शिवाजी पाटील, प्रदीप माने, विजयकुमार देमाना, तुकाराम माने, दीपाली डवर यांसह राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक शिक्षक उपस्थित होते.

🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवा