सुनील भीमराव माने यांची अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशपदी नियुक्ती



प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरटी गावाचे भाचा तसेच तेरवाड (ता. शिरोळ) येथील सुपुत्र मा. सुनील भीमराव माने यांची अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल समस्त चर्मकार समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला तसेच शिरटी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी उपस्थित चर्मकार समाजबांधवांनी त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी रावसाहेब निर्मळे, अर्जुन धुमाळे, नागेश शेजाळे, रामदास भंडारे, नारायण आगवाने आदी मान्यवरांची होती.

कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भंडारे, अरुण भंडारे, पांडुरंग भंडारे, पुंडलिक भंडारे, श्रीकांत भंडारे, सागर भंडारे, नाईक भंडारे यांनी केले. या प्रसंगी शिरटी ग्रामस्थ व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष