प्रगतशील शेतकरी प्रवीण बोरगावे यांना कृषिभूषण पुरस्कार जाहिर



गणेशवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

मलिकवाड (कर्नाटक) येथील शनिग्रह अरिष्ट निवारक मूलनायक श्री 1008 भगवान मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरच्यां वतीने देण्यात येणारा यंदाचा कृषिभूषण पुरस्कार शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील प्रगतशील युवा शेतकरी प्रवीण प्रकाश बोरगावे याना जाहीर झाला आहे. आज पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशी माहिती पुरस्कार वितरण कमिटीने दिली आहे. 

     दरम्यान येथील जैन समाजाच्यावतीने प्रतीवर्षी महाराष्ट्र कर्नाटक सिमाभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. त्यानुसार गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील युवा शेतकरी प्रवीण बोरगावे यांनी विविध प्रकारच्या फळभाज्यांचे भरघोस उत्पादन घेतात. परदेशी बाजारात त्यांनी पीकविण्यात आलेले रंगीबेरंगी ढबू मिरची विक्रीस जाते. तर शेतात नवनवीन प्रयोग करणारे एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख प्रवीण बोरगावे यांनी निर्माण केले आहे त्यामुळे मलिकवाड जैन मंदिरच्यावतीने पू .स्वस्तिश्री सौरभसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी तिजारा (दिल्ली) यांच्या दिव्य सानिध्यात तसेच प्रमुख अतिथी मनोज जैन आय ए एस अधिकारी यांच्या उपस्थित प्रवीण बोरगाव याना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

      तसेच जीवन गौरव पुरस्कार कै. डॉ नेमिनाथ भोमाज यांच्या स्मरणार्थ श्रीमती राजमती भोमाज, शिरगुप्पी,

समाजरत्न पुरस्कार बाळासाहेब पाटील बेडकिहाळ, दान शिरोमणी पुरस्कार महावीर बाबुराव पडनाड संकुनट्टी, तालुका अथणी, धन्वंतरी सेवा पुरस्कार श्री डॉ अनिलकुमार कबाडे सांगली, धर्मगौरव पुरस्कार श्री रविंद्र दादासो पाटील, माणगांव (उद्योगपती), समाजभुषण पुरस्कार श्री बाहुबली बाळासाहेब पाटील, शिरगुप्पी या सर्वच पुरस्कार मूर्तीचा गौरव होणार आहे तसेच महेश कासार जैन, गुलबर्गा यांचा विशेष सत्कार होणार आहे त्यानंतर दुपारी 12.30 वाजता भ. मुनिसुव्रतनाथ पंचामृत महामस्तकाभिषेक कार्यक्रम संपन्न होणार आहे सदर पुरस्कार आज शनिवार 29 रोजी जैन समाज मंदिरात होणार आहे.

या पुरस्कार कार्यक्रमास कर्नाटक महाराष्ट्र सिमाभागातील जैन समाज, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संयोजक रावसाहेब कुन्जुरे, विधानाचार्य दर्शन उपाध्ये, पंडित अजित उपाध्ये सह राजेंद्र पाटील अध्यक्ष, जैन मंदिर कमिटी सह सर्वच श्रावक, श्राविका आदींनी परिश्रम घेतले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष