चुकीच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा उभारणे गरजेचे : राजू शेट्टी

 शिवार न्यूज नेटवर्क :

     देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी एकजूट दाखविल्याने केंद्र सरकारला तीन काळे कृषी कायदे रद्द करणे भाग पडले. त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारला किमान हमीभाव कायदा व सध्या अमेरीका देशाकडून ज्यापध्दतीने साम्राज्यवाद निर्माण करून शेती उत्पादनावर आयात- निर्यातीमघ्ये चुकीचे धोरण अवलंबले जात आहे त्याकरिता सर्वांनी एकत्रित येवून लढा ऊभारणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय किसान महासभेच्या बैठकीत केले. 

         दिल्ली येथील मीनाबाग मधील बिहारचे माकपचे खासदार राजाराम सिंह यांच्या निवासस्थानी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये एम. एस. पी गॅरंटी कायदा , संपुर्ण कर्जमुक्ती , पिकविमा , भुमि अधिग्रहण कायदा या प्रमुख विषयावर संपुर्ण देशात यात्रा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी शेतीपासून परावृत्त होवू लागले आहेत. कृषीप्रधान देशाच्या दृष्टीने हि बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. 

      याकरिता देशातील सर्व संघटनानी सर्वपक्षीय खासदारांना एकत्रित करून त्यांचा दबावगट निर्माण करून केंद्र सरकारला काही धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. या बैठकीस राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे सरदार व्ही. एम. सिंग , जनकिसान आंदोलनाचे प्रमुख योगेंद्र यादव , अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे , बिहारचे खासदार सुदामा प्रसाद , प्रेमसिंग गेहलावत , मा. खासदार हानण मौला , डॅा. सुनिल्लम , भुलैनसिंह रजेवाल यांच्यासह देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष