गावा-गावत भांडणे लावू नका : बबन यादव
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
चिपरी हद्दीत असलेल्या महापारेषण ११० के. व्ही. उपकेंद्रचां मागील पंधरा वर्षापासून ६१ लाख ५० हजार रुपये कर थकीत आहे. सोमवारी ग्रामपंचायतने सिल केल्याने मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळें चिपरी ग्रामपंचायतने सील केल्यामुळे लाईट सुरू करू शकत नाही असे सांगून गावागावांमध्ये भांडणे लावत आहेत. ही बाब अतिशय निंदनीय आहे. मुख्य अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा व जनतेला वेठीस धरू नये असा इशारा माजी सरपंच बबन यादव यांनी दिला.
याबाबत माजी सरपंच बबन यादव म्हणाले, ग्रामपंचायत सातत्याने त्यांच्याशी याबाबत संवाद साधत असताना देखील महापारेषने थकीत करा बद्दल कधीच गांभीर्याने घेतले नाही. याउलट मागील आठवड्यात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे साडेचार लाखाचे थकीत बिलापोटी त्यांनी कोथळी येथून होणाऱ्या गावच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित केली. चार लाख रुपयाचा चेक घेतल्यानंतर चार दिवस बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत झाला महापारेषण ही भूमिका दुटप्पी आहे.
त्यांचे बिल थकीत झाले की लगेच विद्युत पुरवठा बंद करायचा आणि ग्रामपंचायतिचा कर पंधरा वर्षे भरायचा नाही ही बाब गंभीर आहे. चिपरी ग्रामपंचायतने महापारेषण सब स्टेशन सील केल्यानंतर महापारेषण अधिकारी गावागावांमधील लाईट बंद करीत आहेत व चिपरी ग्रामपंचायतने सील केल्यामुळे लाईट सुरू करू शकत नाही असे सांगून गावागावांमध्ये भांडणे लावत आहेत ही बाब अतिशय निंदनीय आहे. महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा व जनतेला वेठीस धरू नये असे त्यानी सांगीतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा