स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक कदम यांनी, स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास रणजित कदम यांनी व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील, विनोद शिरसाठ, मेधा पाटकर उपस्थित होत्या. कारखान्याच्या सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.

तसेच याप्रसंगी आमदार, दलितमित्र अशोकराव माने, दत्त तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप माने, सत्यजित उर्फ नाना कदम, उद्योगपती अशोकराव कोळेकर यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी कारखान्याचे संचालक अरुणकुमार देसाई, संचालिका विनया घोरपडे, संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने गावडे, ज्योतीकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालिका संगिता पाटील-कोथळीकर, अस्मिता पाटील, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदिप बनगे, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.


तसेच शिरोळ माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगा संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, तातोबा पाटील, योगेश पुजारी, अमोल चव्हाण, आप्पासाहेब लठ्ठे, बाळासाहेब कोळी दिवाण, बापुसो गंगधर, शिवाजी संकपाळ,भालचंद्र लंगरे, डॉ. दगडू माने, सुनील इनामदार,भाऊसो पाटील, महादेव कुलकर्णी, पिंटू पाटील, शीतल उपाध्ये, मनोहर गोधडे,अमर कदम, विश्वास पाटील, खंडेराव हेरवाडे, सुनील देशमुख, राजू शहा, बापुसो पुंदे, दिगंबर देशपांडे, गोरखनाथ माने, जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर, माजी हेड टाईम किपर धोंडीराम दबडे, कृष्णा भाट, महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व सभासद, कार्यकर्ते तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, पॉलिटेक्निक कॉलेज, आयटीआयचे प्राचार्य, सर्व शिक्षकवर्ग तसेच दत्त भांडारचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष