शिरोळ तालुक्यात युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेशभाई सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा समन्वयक दिग्विजय चव्हाण, तालुका प्रमुख आकाश शिंगाडे, विधानसभा प्रमुख सचिन पाटील, उपतालुकाप्रमुख रोहित भिसे, प्रवीण दळवी, रविंद्र कोकणे, सुनिल वग्गे, विभाग प्रमुख सुजित कोळी, कुरुंदवाड शहर प्रमुख वैभव तोडकर, शिवाजी नंदिवाले यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या सोहळ्यात युवासेनेच्या भविष्यातील कार्याची दिशा ठरवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. युवकांना संघटित करून सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा