बोरगांव-आयको डांबरीकरण रस्ता कामाचा शुभारंभ
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी एक असणाऱ्या बोरगाव-आयको रस्त्यास माजी मंत्री व आम.शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामाचा शुभारंभ नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
दरम्यान शेसू ऐदमाळे व शंकर गुरव यांनी विधिवत पूजन करून केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे श्रीफळ वाढविण्यात आला.
यावेळी बोलताना नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की,बोरगाव हे व्यापार पेठेचा दर्जा प्राप्त मोठे शहर आहे.त्याचबरोबर कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील शहर म्हणूनहि याकडे पाहिले जाते.त्यामुळे बोरगाव-आयको रस्ता दुरुस्ती करणे काळाची गरज असताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आम.शशिकला जोल्ले दाम्पत्यांच्या निदर्शनास आल्याने तातडीने या रस्ता कामासाठी जवळपास 02 कोटी 30 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची सांगितले.
कार्यक्रमास निपाणी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे,जवाहर साखर संचालक शितल आम्मानावर,जितू पाटील, माजी नगरसेवक उत्तम कदम, अजित कांबळे,अजित तेरदाळे,महिपती खोत,महादेव नेजे,अरविंद म्हैसाळे सर,अमित माळी,जिनेन्द्र आमनावर ,संजय महाजन,आयुब मकानदार,महावीर पाटील,पिंटू बेव्हीनकट्टी,बंडू पाटील,संतोष पाटील,सुरेश चौगुले ,बाबासाहेब चीलीमत्तूर,राजू माळी,जयपाल फिरगान्नावर,महादेव ऐदमाळे,बबन रेंदाळे, राहुल कुंभार यांच्यासह बोरगाव व परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा