प्रसिद्ध केळी व्यापारी ह.भ.प. बबनराव सूर्यवंशी यांचे निधन
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील बुरुड समाजातील प्रसिद्ध केळी व्यापारी ह.भ.प. श्री. बबनराव शंकर सूर्यवंशी (आबा) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दिनांक 28 मार्च 2025 रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने इस्लामपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक कार्यामुळे आणि सामाजिक योगदानामुळे मोठी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे आणि मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी – मंगळवार, 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 08:00 वाजता, कापूसखेड इस्लामपूर स्मशानभूमी येथे. उत्तरकार्य विधी – त्याच दिवशी सकाळी 11:00 वाजता, इस्लामपूर एस.टी. स्टँड रोड येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा