जिल्हा परिषद शाळेची 36 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे सातबारा उताऱ्यावरून कमी

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

      घोसरवाड ता.शिरोळ येथील कुमार विद्यामंदिर या जिल्हा परिषद शाळेची 36 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराला मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य जबाबदार असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यासागर आण्णा बारवाडे यांनी करत या प्रकरणाची खातीनिहाय चौकशी होऊन कृषीवर कारवाई करावी व पत्रकी पुन्हा शाळेच्या नावाची नोंद करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

      निवेदनात पुढे म्हटले आहे सण 1958 सालीं सिद्रामराव परशराम शिंदे सरकार यांनी गट क्र.1030, सर्व्हे क्र.160 मधील 40 गुंठे जमीन विद्यार्थ्यांना शेती कामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कुमार विद्यामंदिर शाळेला शेती प्रशिक्षणासाठी दिली होती.तशी सातबारा पत्रकी नोंद देखील होती.सण 1974-75 ते 2004-05 या काळात सातबारा पत्रकावर ‘निलगिरी झाडे’ असा उल्लेख करत ४० गुंठे ऐवजी ३६ गुंठे क्षेत्राची चुकीची नोंद केली.

पुन्हा 2022 सालात सातबारा पत्रकावरून शाळेचे नाव कमी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

      36गुंठ्याचा सातबाराच गायब’ झाला आहे. मुख्याध्यापक आणि शाळा व्यवसथापन कमिटीचे याकडे दुर्लक्ष म्हणूनच ही नोंद रद्द झाली असल्याचा आरोप बारवाडे यांनी केला आहे.

        सदरची जमीन शाळा व्यवस्थापन कमिटीने शेती कसण्यासाठी एक शेतकऱ्याला 2022 ते 2027 सालापर्यंत कसायला दिल्याचा करार शाळेकडे उपलब्ध आहे.करारानुसार ठरलेली रक्कम शाळेच्या खात्यावर जमाच नाही शाळा व्यवस्थापन कमिटी व मुख्याध्यापकांनी रक्कम जमाच केली नसल्याचा ही आरोप तक्रारीत केला आहे.

     सातबारा पत्रकावरून शाळेचे नाव गायब होऊन सातबारा गायब झाल्याची तक्रार मारवाडी यांनी निवेदनाद्वारे करत सखोल चौकशी होऊन शाळेची जमीन शाळेच्या नावावरून झाल्यास तीव्र आंदोलन सुरू असा इशारा दिल्याने घोसरवाडमध्ये खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष