शिरोळ तालुक्यातील श्रेयांश पाटील याची आयआयएम बेंगळुरूसाठी निवड

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड येथील श्रेयांश अजित पाटील याने कॉमन ॲडमिशन टेस्ट (CAT) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवत आयआयएम बेंगळुरूमध्ये प्रवेश मिळवला आहे. शिरोळ तालुक्यातून आयआयएम बेंगळुरूमध्ये निवड होणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे.

      श्रेयांशचे प्राथमिक शिक्षण संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, कुरुंदवाड येथे झाले. पुढे त्याने सैनिक स्कूल सातारा आणि नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून येथे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने आयआयटीसाठीही प्रयत्न केला.

     त्याच्या यशामागे शैक्षणिक मेहनतीबरोबरच घरातील वैचारिक वातावरणाचा मोठा वाटा आहे. त्याचे आजोबा रावसाहेब (दा. आ.) पाटील हे कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आहेत, घरातील वाचनसंस्कृती, समाजभान आणि पर्यावरणाविषयीची जाण यामुळे त्याच्यात व्यापक दृष्टीकोन विकसित झाला. त्याने अनेक शाळांमध्ये पर्यावरण विषयक व्याख्याने दिली आहेत.

     व्यवस्थापन क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने त्याने कॅट परीक्षा दिली. अपार मेहनत, चिकाटी, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि ज्ञानलालसेच्या जोरावर त्याने हे यश मिळवले.या यशात बोरवडे येथील साठे सर, आजोबा रावसाहेब पाटील, वडील अजित पाटील (साने गुरुजी शिक्षण संस्थेचे सचिव), आई दीपाली पाटील, आजी विजया पाटील तसेच काका-काकू यांचे मार्गदर्शन लाभले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष