श्री दत्त साखर कारखान्याला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा 'नॅशनल को जनरेशन अवॉर्ड'
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तांत्रिक कार्यक्षमता या विभागामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देश पातळी वरील प्रथम क्रमांकाचे 'नॅशनल को जनरेशन अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कारखान्याचे को जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना 'बेस्ट को जन मॅनेजर' म्हणून गौरविण्यात आले.
नॅशनल को जनरेशन पुरस्कार 2024 सोहळ्याचे आयोजन पुणे येथील आर्किड हॉटेलमध्ये करण्यात आले होते. माजी कृषिमंत्री, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला.
को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशांतील सहकारी व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये असलेल्या को जनरेशन प्लँट बद्दल माहिती घेऊन विविध विभागामध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश यास विविध राज्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. खाजगी व सहकारी क्षेत्रातील कारखान्याच्या को जनरेशन प्लँट साठी श्री दत्त साखर कारखान्याने सहभाग नोंदविला होता. तांत्रिक कार्यक्षमते मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल कारखान्याला मानाचा प्रथम क्रमांकाचा देश पातळीवर पुरस्कार मिळाला. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, को जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कारखान्याचे को जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना 'बेस्ट को जनरेशन मॅनेजर' म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत जयप्रकाश साळुंखे दांडेगावकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. संगीता कस्तुरे यांनी केले.
श्री दत्त कारखानाला को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने श्री दत्तच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून या कामगिरी बद्दल कारखान्याच्या विश्वस्तांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा