अपघात प्रवण मार्ग होणार सुरक्षित आणि निसर्ग संपन्न

वृक्षारोपण, उपाययोजना; उद्योगपती विनोद घोडावत यांचा पुढाकार 

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

     कोल्हापूर-सांगली महामार्गावरील चिपरी फाटा ते मनीषा ऑटोमोबाईल दरम्यानच्या अपघात प्रवण मार्गावर आता सुरक्षित वाहतुकीसह वनराई फुलणार आहे. उद्योगपती विनोद घोडावत यांच्या पुढाकाराने या चार किलोमीटर महामार्गावर अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना, दोन्ही बाजूला गुलमोहर, विविध प्रकारची फुल झाडे आणि शोची जवळपास एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. उद्योगपती विनोद घोडावत यांच्यामुळे अपघात प्रवण क्षेत्राची ओळख पुसली जाणार असून लवकरच निसर्गरम्य वातावरणातून वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. 

    कोल्हापूर-सांगली महामार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून देखील मार्गाचे वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जात नव्हती. मार्गाच्या दोन्ही बाजूला असणारी काठाळी अपघाताचे प्रमुख कारण बनले होते. हा चार किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खूपच धोकादायक बनला होता. सातत्याने लहान-मोठे अपघात होत होते. यात काहींचा बळी गेला असून अनेक जण जायबंद झाले आहेत तर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानी होत आहे. 

    वाहनधारकांची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित होती. परिणामी हा मार्ग अपघात प्रवण बनला होता. सततचे अपघात आणि असुरक्षित मार्ग ही बाब लक्षात घेऊन दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, उद्योगपती विनोद घोडावत यांनी स्वखर्चाने मार्गावर उपाययोजना करून वाहतुकीस सुरक्षित बनवला आहे. जवळपास ५० ते ६० ट्रॉली मुरमाने अपघातात कारणीभूत ठरणारी रस्त्याची काठाळी भरून घेतली आहेत. त्यावर रोलर फिरवून अपघात होणार नाही याची दक्षता घेतली आहे. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची जवळपास एक हजार वृक्षांचे रोपण करून त्यांचे संगोपन केले जात आहे. उद्योगपती विनोद घोडावत यांच्या या सामाजिक कार्यामुळे भविष्यात अपघात टाळणे शक्य होणार आहे. शिवाय हिरव्यागार वनराईतून प्रवास करण्याचा अनुभव वाहनधारकांना मिळणार आहे. 

उद्योगपती विनोद घोडावत यांनी दानचंदजी घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहर व परिसरातील अनेक गावांमध्ये सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे. खास करून शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. शिवाय अपंग पुनर्वसन संस्थेस जवळपास ६० लाख रुपये किमतीची सहा गुंठे जमीन मोफत दिली असून घोसरवाडच्या जानकी वृद्धाश्रमाला बांधकामासाठी मोठा निधी दिला आहे. याबरोबरच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सीसीटीव्ही प्रकल्प, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण अशी विविध सामाजिक कामे केली आहेत. 

अपघाती क्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या मार्गावर अपघात, बळी आणि वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केला आहे. शिवाय अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना देखील राबविल्या आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळपास एक हजार विविध प्रकारचे वृक्ष लागवड केले आहे. त्यांचे संगोपन करून लवकरच हा मार्ग हिरवाईने नटला जाणार आहे. सामाजिक कार्यातून मिळणारे समाधान अमूल्य आहे. 

 -उद्योगपती विनोद घोडावत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष