शिरोळ तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना आमदार यड्रावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील नव्याने निवड झालेल्या अंगणवाडी मदतनीसांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरोळ-१ मनीषा पालेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरोळ-२ सुप्रिया पवार, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) अनिल घोडेस्वार, तसेच पर्यवेक्षिका माया पुजारी, संगीता चावरे, संगीता सामंत, शाहिन पठाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार यड्रावकर यांनी नव्या अंगणवाडी मदतनीसांचे अभिनंदन केले. अंगणवाडी केंद्रांद्वारे लहान बालकांचे पोषण, शिक्षण व आरोग्य सेवा पुरवली जाते. त्यामुळे या सेवेत कार्यरत असलेल्या महिलांची भूमिका फार महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या कर्तव्यांची माहिती दिली व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे नव्या मदतनीसांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी आपल्या कामातून सामाजिक विकासात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा