भविष्यात धरणग्रस्त व्हायचे नसेल तर हरकती दाखल करा : धनाजी चुडमुंगे
खिद्रापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक सरकार ने आलमट्टी धरनाची उंची वाढवण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु केले आहेत.उंची वाढवण्यास त्यांना परवानगी मिळाली तर शिरोळ तालुक्यात दरवर्षी महापुराचे संकट येणार आहे.तसं झाले तर शिरोळ तालुका भविष्यात धरणग्रस्त म्हणून जाहीर करून दरवर्षी पावसाळ्याच्या काळात आपल्याला गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जागा शोधावी लागेल हे लक्षात घेऊन या धरणाच्या उंचीला सर्वांनी वेळीच जागे होऊन हरकत घ्यायला पाहिजे असे आवाहन धनाची चुडमुंगे यांनी खिद्रापूर येथे केले.
आंदोलन अंकुश ने आलमट्टी च्या उंचीला विरोध म्हणून केंद्र सरकार कडे हरकती दाखल करण्यासाठी अभियान चालवले आहे त्या अनुषंगाने ते काल सायंकाळी खिद्रापूर येथे आले होते त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाकडे कर्नाटक सरकार ने आलमट्टी ची उंची 524 मीटर करण्यास परवानगीचे नोटिफिकेशन काढण्याची मागणी केली आहे आणि या महिना अखेर त्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय जल शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी बैठक बोलावली आहे. त्या बैठकी पूर्वी या उंचीला आमचा विरोध आहे म्हणून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून मोठया प्रमाणात हरकती दाखल करण्याचे नियोजन आहे. खिद्रापूर मधील नागरिकांनी रजिस्टर पोस्टाने हरकती पाठवाव्यात व आपला विरोध दर्शवावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.यावेळी आंदोलन अंकुश चे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील खिद्रापूर ग्रामपंचायत उपसरपंच दयानंद खानोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत मियाखान मोकाशी यांनी केले तर आभार माजी उप सरपंच हैदर मोकाशी यांनी मानले यावेळी रशीद मुल्ला ग्रामपंचायत सदस्य इरषाद मुजावर व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा