हरोली विकास सेवा संस्थेवर यड्रावकर गटाची सत्ता

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

हरोली येथील हरोली विविध विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील श्री राजर्षी शाहू संस्था बचाव बहुजन शेतकरी विकास पॅनलने दमदार विजय मिळवला. रविवारी (दि. २७) शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीत १३ जागांसाठी मतदान झाले, त्यात बहुजन शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर बाजी मारली, तर विरोधी गटाला केवळ ३ जागा मिळाल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी पी. जे. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. याआधी संस्थेवर सत्ताधारी विकास पॅनलची सत्ता होती. मात्र, यंदा सभासद व शेतकरी बांधवांनी श्री राजर्षी शाहू संस्था बचाव बहुजन शेतकरी विकास पॅनलवर आपला विश्वास ठेवल्याने सत्तांतर घडले.

निवडणूक निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष साजरा केला. नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी नूतन संचालक तानाजी माने, संभाजी कदम, लक्ष्मण माने, नागेंद्र माने, बबन जाधव, मारुती माने, जगदीश जाधव, शहाजी माळी, साधना माने, चंदना भाट यांच्यासह भरतकुमार चौगुले, संग्राम भोसले, ईश्वरा माने, सुनील पाटील, उदय भोसले, नेमिनाथ चौगुले, रामा माने, आनंद भोसले, शांतिनाथ पाटील, अमर पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष