सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सलग पाचव्या दिवशी आंदोलन

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

      कुरुंदवाड शहरासाठी नूतन नळ पाणीपुरवठा योजनेच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्वपक्षीय कृती समितीने साखळी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधले. या कामासाठी राज्य सरकारने तात्काळ आत्मीयता दाखवून ४९ कोटी रुपये पालिकेच्या खात्यावर वर्ग करून प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

      पाचव्या दिवशी सुरू असलेल्या या साखळी उपोषणात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये एन. डी. पाटील, गौतम पाटील, बाबासाहेब सावगवे, कुमार कोरवी, तानाजी आलासे, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र बेले, अनिकेत बेले, हर्षद बागवान, चंद्रकांत गावडे, जितेंद्र साळुंखे आदींचा समावेश होता. सर्व आंदोलकांनी एकजुटीने मागणी करत शासनाचे लक्ष वेधले.

     यावेळी बोलताना सावगावे म्हणाले शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या पाणीटंचाई गंभीर बनली आहे. नागरिकांना सातत्याने पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याचा सामना करावा लागत असून, नव्या योजनेची अंमलबजावणी अत्यावश्यक झाली आहे. तरी देखील निधी मंजुरीचा आणि प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.                   राजेंद्र बेले यांनी भविष्याचा विचार करून, तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क जोपासण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा," अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. तसेच, निधी मंजूर होईपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष