चिंचवाडच्या मैदानात श्रीमंत भोसले विजयी

 


 चिंचवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

चिंचवाड (ता. शिरोळ) येथे श्री वाघजाई देवी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात इचलकरंजीच्या श्रीमंत भोसले विरुद्ध सचिन ठोंबरे यांच्यात जोरदार लढत झाली. उशिरापर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये गुणांवर श्रीमंत भोसले यांनी अत्यंत रोमांचक आणि चुरशीने पैलवान सचिन ठोंबरे यांचा पराभव केला.

चिंचवाड येथे आयोजित भव्य निकाली कुस्ती मैदानाचे उद्घाटन गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गणपतराव पाटील व अमृतामामा भोसले, गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन नंबरची कुस्ती रोहन रंडे विरुद्ध प्रदीप ठाकूर यांच्यात झाले यामध्ये रोहन याने एकचाक डाव वरती विजयी मिळवला. तीन नंबरची कुस्ती रणजित राजमाने विरुद्ध अतुल डावरे यांच्यात झाले. यामध्ये डावरे जखमी झालामुळे रणजित राजमाने विजयी झाले. चार नंबरची कुस्ती विनायक वासकर विरुद्ध रोहित चव्हाण यांच्यात झाली. यामध्ये वासकर यांनी दुहेरी पटवरती रोहित चव्हाणला चितपट केले. तसेच छोटे-मोठे पन्नासहून अधिक कुस्त्या यावेळी झाल्या. एक नंबरची कुस्ती श्रीमंत भोसले सचिन ठोंबरे यांच्यात झाली. पहिल्या काही मिनिटांतच दोन्ही पैलवानांनी समान ताकद दाखवून गुण मिळवले. मधल्या काळात सचिन ठोंबरे यांनी काही आक्रमक खेळी करत सामन्यावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इचलकरंजीच्या पैलवानाच्या भक्कम बचावाने त्यांच्या सर्व मनसुबे हाणून पाडले. चपळतेने प्रतिहल्ले चढवून इचलकरंजीच्या पैलवानाने निर्णायक आघाडी मिळवली आणि अखेर गुणांच्या जोरावर विजय निश्चित केला. सचिन ठोंबरे यांनी शेवटपर्यंत हार मानली नाही आणि तडफदार झुंज दिली, मात्र थोडक्याच फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला.

      कार्यक्रमात विजयी पैलवानाचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी, मा. माधवरावजी घाटगे, अध्यक्ष गणपतराव पाटील, अमृता मामा भोसले, सरपंच जालिंदर ठोमके, नारायण मोहिते, आदित्य घाटगे, बजरंग खामकर, संदीप पाटोळे, सुरेश गोधडे, अभय चौगुले, विठ्ठल घाटगे, पंकज चौगुले, विजय गोधडे, कुमार माने, राजेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सुनील चव्हाण, शरद गोधडे, युवराज गोधडे, संदीप कदम, संतोष गोधडे, प्रकाश पाटोळे, प्रमोद चव्हाण, नायकु गोधडे व सर्व कुस्ती समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष