धैर्यशील खाडे यांचे निधन
कोथळी :
कोथळी (ता. शिरोळ) येथील रहिवासी, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच कुरुंदवाड एस.टी. डेपोचे निवृत्त चालक व एस.टी. कामगार संघटनेचे माजी पदाधिकारी श्री. धैयर्शिल लक्ष्मण खाडे यांचे सोमवार, दि. २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
धैयर्शिल खाडे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. परिसरात त्यांना राजू व अप्पा या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने कोथळी व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंतिम धार्मिक विधी अंतर्गत जलदान विधी (रक्षाविषर्जन) मंगळवार, दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता कोथळी येथे होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा