हेरले येथील दोन शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव


संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा हातकणंगले मार्फत दिला जाणारा गुरूवर्य ना.भा. शिंपी गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार हेरले येथील शाळा क्र. २ चे अध्यापक आर. बी. पाटील व केंद्रशाळा हेरलेच्या अध्यापिका निगार कराडे यांना प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले तालुक्यातील घोडावत कॉलेज, अतिग्रे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष मा. अर्जुन पाटील, तालुका अध्यक्ष मा. सचिन कोल्हापूरे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार हेरले केंद्राचे केंद्रप्रमुख शहाजी पाटील, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात संपन्न झाला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष