एक एकरात ११७ टन विक्रमी ऊस उत्पादन ; सातेंद्र खुरपे यांचा शिरोळ तालुक्यात द्वितीय क्रमांक

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 ऊस पिक स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सातेंद्र खुरपे यांनी एक एकर क्षेत्रात तब्बल ११७ टन विक्रमी ऊस उत्पादन घेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि महाधन ॲग्रोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गळीत हंगाम 2024-25 ऊस पिक स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सातेंद्र खुरपे यांचे हे उत्पादन आधुनिक शेतीतंत्रज्ञान, नियोजनबद्ध मशागत, योग्य बियाण्यांची निवड, पाणी व्यवस्थापन आणि खतांचा संतुलित वापर या घटकांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभप्रसंगी व्ही.एस.आय.चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यान पंडित गणपतराव पाटील, हवामान अभ्यासक पंजाबराव डख, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. जयवंत जगताप, मृदशास्त्र तज्ञ डॉ. संतोष करंजे, महाधन ॲग्रोटेकचे बिपिन चोरगे, माजी आमदार उल्हासदादा पाटील आणि कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

खुरपे यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा मिळाली असून, आधुनिक पद्धतींचा योग्य वापर करून शेतीमध्ये भरघोस उत्पादन शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सातेंद्र खुरपे, नेमिनाथ खुरपे, अमोल खुरपे यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी योग्य परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष