हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या तेरवाड शाखेचा शुभारंभ बुधवार, ३० एप्रिल रोजी

 


तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., हेरवाड (शाखा - तेरवाड) च्या नव्या शाखेचा शुभारंभ बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, प्रा. करमरकर यांच्या नवीन इमारतीतील गाळा नं. १, तेरवाड येथे संपन्न होणार आहे.

या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्यानपंडित गणपतराव पाटील असतील.

प्रमुख पाहुणे म्हणून के.डी.सी.सी. बँक संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लीकर, गोकुळ दूध संघ संचालक अजित नरके, दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, ग्रामपंचायत तेरवाडच्या सरपंच पोर्णिमा गोंधळी, केंद्रीय महामंडळाचे संचालक संजयदादा पाटील, गोकुळ दूध संघ संचालक संभाजी पाटील, राज कन्सल्टन्सीचे माणिकराव पोळ व ग्रामपंचायत हेरवाडच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेखा जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ व सेवक वर्ग यांच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष