कुरुंदवाडच्या साखळी उपोषणस्थळी आम. डॉ पाटील-यड्रावकर यांची भेट

 



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

         कुरुंदवाड शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पुढील दोन महिन्यांत प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगीतले.

          कृती समितीचे नेते राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, तानाजी आलासे, जितेंद्र साळुंखे म्हणाले 2014 मध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी सहा कोटी रुपये निधी मिळाला होता. मात्र योजना अपूर्ण राहिल्याने तो निधी वापरात न आणता बँकेत ठेवण्यात आला, जो आता व्याजासह 11 कोटी 24 लाख 4 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय नागरिकांनी भरलेली पाणीपट्टी व लोकसहभागातून जमा झालेला सुमारे तीन कोटींचा निधीही पालिकेकडे उपलब्ध आहे. त्यामुळे एकूण 14 ते 15 कोटी रुपयांचा निधी तयार आहे.

         या निधीचा उपयोग नव्या योजनेसाठी करावा, यासाठी शासनाने तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी कृती समितीची मागणी आहे. मात्र पालिकेचे लेखापाल आतिश काटकर यांनी सांगितले की, जुनी योजना रद्द झाल्यामुळे त्या निधीचा वापर थेट नवीन योजनेसाठी करता येणार नाही. त्यासाठी नवीन योजनेसाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता घेऊन निधी वर्गीकरणाचा प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे असे सांगितले.

      शासनाकडे सध्या निधीची टंचाई आहे पालिकेच्या खात्यावर असलेला निधी या योजनेसाठी वापरण्यात यावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडे आम.डॉ. पाटील- यड्रावकर यांनी प्रयत्न करावे अशी मागणी कृती समितीने केली.

       यावेळी प्रा चंद्रकांत मोरे,राजेंद्र बेले, प्रवीण खबाले,शंभूराज घाटगे,संदीप कडाळे, केशव देशपांडे,चंद्रकांत गावडे,अनिकेत बेले,किरण मोगणे,आर्षद बागवान,मिरासाहेब पाथरवट,विनायक माणगावकर,राजेंद्र आंबले, केदार पाटूकले,रियाज शेख आदी उपस्थित होते.


  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष