दत्त महाविद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अभिषेक निपाणे यांचा सत्कार
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड ता. शिरोळ नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अभिषेक निपाणे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे. पाटील, वडील सुरेश निपाणे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिषेक निपाणे म्हणाले, महाविद्यालयाने मला शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच खेळाचे मार्गदर्शन केल्यानेच मी ही यशाची उंची गाठू शकलो .कायम मी महाविद्यालयाचा ऋणी राहीन.
सहा. शिक्षक श्री आर आर टाकमारे यांनी अभिषेकच्या घोडदौडीचे थोडक्यात विश्लेषण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील यांनी अभिषेकच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन यथोचित सत्कार केला. तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे असे यावेळी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा