"हरकतींचा पाऊस पाडाल तरच पुरमुक्ती मिळेल" — धनाजी चुडमुंगे



शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क : 

 आलमट्टी धरणाच्या उंची वाढीला महाराष्ट्र सरकार रोखू शकत नसल्याने या निर्णयाचा फटका स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दरवर्षी पूर परिस्थितीच्या रूपाने बसतो आहे. त्यामुळे आलमट्टी धरणाच्या उंचीला कायदेशीररित्या विरोध केला नाही, तर भविष्यातील पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.

शिरटी व हसूर गावांमध्ये ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने नागरिकांकडून केंद्र सरकारकडे हरकती दाखल करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत काल शिरटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कोपरा सभा झाली. या सभेत बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले, “आलमट्टी धरणाच्या उंचीला आपला विरोध आहे, हे स्पष्टपणे मांडण्यासाठी नागरिकांनी कायदेशीर हरकती दाखल करणं गरजेचं आहे. हीच एकमेव शाश्वत वाट आहे जी आपल्याला दरवर्षीच्या पुरांपासून वाचवू शकते.”

ते पुढे म्हणाले, “जर आपण आत्ताच एकत्र येऊन या अन्यायकारक निर्णयाला विरोध केला नाही, तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य अंधारात जाईल. आंदोलन अंकुशने या गंभीर विषयाची जबाबदारी घेतली असून, नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभागी होणं आवश्यक आहे.”

या वेळी शिरटी गावचे सरपंचपती आलम मुल्लानी, प्रगतशील शेतकरी डॉ. अरुण चौगुले, आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे, पिंटू ढेकळे, धनु जगनाडे, संदीप चौगुले, अशोक चौगुले, सचिन खोबरे, बाळासो बंडगर, सागर काडपुरे, महावीर कोगनोळे, विलास भोसले, शीतल खवाटे, आप्पासो उपाध्ये, प्रकाश गुरव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष