शिवार न्यूजचे पत्रकार संदीप कोले निर्भीड पत्रकार पुरस्काराने गौरव

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिवार न्यूजचे पत्रकार संदीप कोले यांना त्यांच्या निर्भीड आणि समाजप्रवृत्त पत्रकारितेच्या योगदानाबद्दल "निर्भीड पत्रकार" पुरस्काराने गौरवण्यात आले.

पुणे येथील अग्रगण्य वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्हच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे पार पडला. हा सोहळा दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक व कोकण विभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पत्रकार संदीप कोल्हे यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, सामाजिक अन्याय आणि स्थानिक मुद्दे धाडसाने मांडत लोकशाहीला सक्षम करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या पत्रकारितेच्या धाडसपूर्ण प्रवासाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुण्याचे माजी नगरसेवक व मुस्लिम बँकेचे ज्येष्ठ संचालक मा. श्री. अय्युब शेख यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीत मराठी चित्रपट अभिनेत्री पद्मजा खटावकर, शांताई संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे, वरिष्ठ पत्रकार फिरोज मुल्ला (पुणे), अल्फाज टाईम्सचे संपादक राजेखान पटेल, दैनिक गगन ताराचे संपादक सुभाष भिके (कोल्हापूर), रविराज ऐवळे (दैनिक अप्रतिम, शिरोळ), सिने अभिनेते महम्मद रफिकमांगुरे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मा. श्री. अय्युब शेख यांनी प्रायोजकत्व केले, तर अल्फाज टाईम्सचे संपादक श्री. राजेखान पटेल यांचे विशेष सहकार्य लाभले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष