राज्यात दहावी परीक्षेत पाचवा क्रमांक आलेल्या बोरगांवची कन्या रीया कमते हीचा शांती सागर संस्थेच्या वतीने सत्कार
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक राज्यात मार्च एप्रिल मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती, परीक्षेचा निकाल नुकताच मे महिन्यात लागलेला असून यामध्ये बोरगाव येथील एम के मार्ट चे भागीदारी मालक श्री विद्याधर कमते यांची मुलगी कुमारी रीया कमते हिने 600 पैकी 621 मार्कस मिळवून राज्यात पाचव्या क्रमांकाने पास होण्याचा मान मिळवला आहे.त्यानिमित्त येथील आचार्य श्री 108 शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटी यांच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ,नगरसेवक, शरद जंगठे व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे कृषी अधिकारी नामदेव बन्ने यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यीनीचा शाल ,श्रीफळ, हार व आर्थिक सहकार्य देऊन रीया कमते, व शिवानी नाईक हीचा सत्कार करण्यात आला.
. बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांती सागर को आप सोसायटी यांच्यावतीने नुकताच बोरगाव परीक्षा केंद्रातील सर्व हायस्कूलच्या एक दोन तीन अशा टॉपर. 20 विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व त्यांना सन्मानपूर्वक आर्थिक मदत व सत्कार करण्यात आला होता. रीया विद्याधर कमते ही बोरगांव ची रहीवाशी असून ती शेतकरी कुटुंबातील आहे,कर्नाटकातील नामांकित अल्वास कन्नड मिडीयम स्कूल मूडबिद्री येथे शिक्षण घेत होती. राज्यातील दहावी परीक्षेत 621/600 म्हणजे 99.36% गुण प्राप्त करून मूडबिद्री संस्थेचे व बोरगाव चे नाव उज्वल केले आहे.व तसेच शांती सागर संस्थेचे सहकारी भाऊसाब नाईक यांची मुलगी कुमारी शिवानी नाईक ही बारावी सायन्स मध्ये 70% मार्कस मिळवल्या बद्दल या दोघी गुणी विद्यार्थिनींचा संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. व भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. *. यावेळी हाल सिद्ध नाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री शरद जंगठे,कृषी अधिकारी नामदेव बन्ने,अजित कांबळे,,राजू माळी,महिपती खोत,महादेव आयीदमाळे,भारत पाटील ,जितू पाटील ,गुंडा गोरवाडे, ,सुरेश बेळेंके,निलेश पाटील, मुद्दना हांडे, मल्लू खोत, भाऊसाब नाईक,महादेव चीगरे,शैला मगदूम,लक्ष्मी गावडे,निता गुरव, यांच्यासह गुणी विद्यार्थी,पालक,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा