कोंडीग्रेच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संतोष कांबळे यांची बिनविरोध निवड
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कोंडीग्रे (ता. शिरोळ) या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी संतोष कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उज्वला पाटील ह्या होत्या. तंटामुक्त अध्यक्ष यांच्या निवडीचे कामकाज ग्रामसेवक इलियास मुल्ला व कोंडिग्रे गावचे पोलीस पाटील डॉ. सतीश कांबळे यांनी पाहिले. संतोष कांबळे यांची तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी मावळते तंटामुक्त अध्यक्ष जिवाजी कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. तंटामुक्त अध्यक्ष निवडीच्या वेळी कोंडीग्रे गावचे माजी सरपंच नानासो कांबळे. सोसायटीचे चेअरमन सुनील कामत,कुमार कांबळे, जयदीप पाटील, केतन कांबळे, रोहित कांबळे आधी मान्यवर व गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा