गणेशवाडीमध्ये मंगळवारपासुन रंगणार किर्तन महोत्सव
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील कै.ह.भ.प.गुंडाप्पा गुराप्पा बिळशिट्टे यांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीनिमित्त मंगळवार दि.२७ व २८ रोजी दोन दिवसीय हरिपाठ व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कै.ह.भ.प.गुंडाप्पा बिळशिट्टे हे अध्यात्मिक सांप्रदायाचे होते.यांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीनिमित्त त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी त्यांचे चिंरजीव चंद्रकांत गुंडाप्पा बिळशेट्टी व राजेंद्र गुंडाप्पा बिळशेट्टी यांनी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे दोन दिवसीय हरिपाठ व किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यामध्ये मंगळवार दि.२७ रोजी सांयकाळी ५ वाजता हरिपाठ व सांयकांळी ७ वाजता आळंदी पुण्याचे स्वरभास्कर श्री.ह.भ.प.अनिकेत महाराज बांगर यांचे सुश्राव्य किर्तन होईल.
बुधवार दि.२८ रोजी सकाळी प्रतिमा पुजन,दुपारी १२ वाजता महाप्रसाद,सांयकाळी ५ वाजता हरिपाठ,सांयकाळी ७ वाजता झी टाॅकीज फेम,पुण्याचे युवा किर्तनकार गो सेवक,ह.भ.प.नेहाताई भोसले( साळेकर )यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
किर्तन महोत्सवासाठी आळंदी देवाची येथील महाराष्ट्रातील नामवंत कलाकार गुणीजन मंडळी किर्तनसाथ देणार आहेत.
गणेशवाडी येथील गणपती मंदिरासमोर या वैष्णांवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी गणेशवाडी पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांत व राजेंद्र गुंडाप्पा बिळशिट्टे बंधुनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा