संततधार पावसामुळे तेरवाड बंधारा पाण्याखाली
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या सुरू असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे पंचगंगा नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून, तेरवाड येथील बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत तेरवाड तर्फे नागरिकांना, शेतकऱ्यांना व प्रवाशांना बंधाऱ्यावरून ये-जा न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही धोका पत्करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
सध्याची स्थिती पाहता, बंधाऱ्याजवळ जाणे टाळावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असेही ग्रामपंचायतीने सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा