आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून कनवाड गावाला नवी नौका
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील कनवाड गावाला नवी नौका मिळाली असून ग्रामस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीची पूर्तता झाली आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून ही नौका देण्यात आली असून संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता या नौकेचा मोठा उपयोग होणार आहे. कनवाड हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेले असून पूरपरिस्थितीमुळे गावाचा संपर्क तुटतो आणि नागरिक हालअपेष्टा सहन करतात. त्यामुळे नौका उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची होती.
ही गरज लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूरने कनवाड गावासाठी नौका देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत – विशेषतः पूरग्रस्त काळात ही नौका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अन्नधान्य, वैद्यकीय मदत किंवा स्थलांतराच्या दृष्टीनेही याचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे गावामध्ये समाधानाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा