पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण

 


संदीप कोल / शिवार न्यूज नेटवर्क : 

 हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील ग्रामपंचायत च्या वतीने आशा स्वयंमसेवीके मधील उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन हेरले ग्रामपंचायत स्तरीत पुरस्कारासाठी वहिदा सज्जन खतीब आशा , सुजाता सुधीर कचरे सी.आर. पी. बचत गट यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील उर्मिला कुरणे, माजी उपसरपंच बक्तीयार जमादार, हातकणंगले पंचायत समिती सभापती माजी सभापती जयश्री कुरणे व इतर महिला व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर कामधेनु पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन आदगोंडा पाटील यांच्या संचालक व सभासद यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष