शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

 

नदीकाठावरील कृषीपंप काढण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग

अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क : 

आठवडाभर बरसत असलेल्या दमदार मान्सुनपुर्व पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.यामुळे कृष्णा नदीकाठावर शेतीला पाणी उपसा करणारे कृषीपंप सुरक्षित ठेवण्यासाठी गौरवाडसह परिसरातील शेतकर्‍यांची लगबग दिसुन येत आहे.

 विविध धरणातुन कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरु नसतानाही धुवाँधार मान्सुनपुर्व पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

  शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रविवारी एका दिवसात साडेतीन ते चार फुटाने वाढ झाली आहे.पाऊस अजुनही धो..धो..कोसळत आहे.यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णानदीचे पाणी कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडु शकते.सद्या नदीकाठावरील गवतकुरणात पाणी विस्तारत आहे.परिणामी गवत बुडण्या आधी ते कापुन आणण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे.

  शिरोळ तालुक्यातील राजापुर धरणावर रविवारी २२.३ फुट पाणी पातळी होती. तर येथुन २०७५० क्युसेक प्रतिसेंकद विसर्ग होता.

 रविवारी दिवसभर तुरळक पाऊस होता.मात्र पुन्हा सांयकांळी सातनतंर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.हवामान खात्याने पुढील दोन दिवस जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत.यामुळे शिरोळ तालूक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊन नदीचे पाणी कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडु शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष