हेरवाड येथे श्री गुरुचरीत्र व परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड (ता. शिरोळ) येथे परमात्मराज महाराज (श्री क्षेत्र आडी) यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित श्री गुरुचरीत्र व परमाब्धि ग्रंथ पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. श्री हनुमान मंदिर, हेरवाड येथे १५ ते २१ मे दरम्यान दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पारायण वाचन करण्यात आले. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेतला.

या वर्षीच्या पारायण सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून, वर्षानुवर्षे या सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद अधिकच वाढत चालला आहे. पहिल्या दिवसापासूनच गावातील तसेच परिसरातील भक्तगण मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. पारायणाच्या समाप्तीनंतर २१ मे रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शेकडो भाविकांनी सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ह.भ.प. श्री. महादेव वाळके (अकिवाट), ह.भ.प. श्री. विलास शिरढोणे (हेरवाड), प्रसिद्ध कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर माने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जय हनुमान कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, हेरवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावातील युवकांनी देखील स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

एकूणच, सात दिवस चाललेल्या या अध्यात्मिक सोहळ्यामुळे गावात भक्तिप्रधान वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांनी पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात हा सोहळा पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष