दत्तवाड- मलिकवाड बंधारा पाण्याखाली

 


इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

कर्नाटक- महाराष्ट्र राज्याला जोडणारा दूधगंगा नदीवरील दत्तवाड- मलिकवाड बंधारा पाण्याखाली गेला असून या बंधार्‍यावरून प्रवाशांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सध्या पाचवा मैल -बोरगाव व दानवाड- एकसंबा या मार्गाने प्रवासी प्रवास करत आहेत. दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याकारणाने दत्तवाड- एकसंबा हा बंधारा सुद्धा पाण्याखाली गेला आहे. सतत पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढलेली आहे. त्यामुळे नदी पात्राबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष